ताज्या बातम्या
फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणं आलं अंगाशी
पुणे: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणावर वाढला असून यातून अनेकदा मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे देखील होताना पाहायला मिळतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका व्यावसायिकाबरोबर घडल्याचं पाहायला मिळालं.त्याच्या फेसबूक वरील मैत्रिणीने त्याला भेटायला हॉटेल वर बोलावले.मात्र, हॉटेलमध्ये गेल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडत सायबर पोलीस असल्याचं भासवून व्यावसायिकाला तब्बल ५३ हजार ५०० रुपयांना लुटले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ ऑगस्टरोजी घडला आहे