ताज्या बातम्या

महाराष्ट्र – पोलीस दलातील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या; पिंपरी चिंचवडला मिळाले आणखी 2


  • मुंबई : बहुजननामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात आणखी दोन पोलीस उपायुक्त निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली होती.त्यानुसार गृह मंत्रालयाने पोलीस उपायुक्तांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली केली आहे. बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाचे (Government of Maharashtra) अवर सचिव स्वप्निल गोपाल बोरसे (Swapnil Gopal Borse) यांनी काढले आहेत. (Maharashtra DCP – SP Transfers)

 

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पदे निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार आता ही पदे भरण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने शासनाने दोन पोलीस उपआयुक्त पदे निर्माण करण्यास मान्यता दिली होती. (Maharashtra DCP – SP Transfers)

 

बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे

 

1. संदीप डोईफोडे DCP Sandeep Doifode (पोलीस अधीक्षक, फोर्स वन (U.C.T.C.) ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)

 

2. शिवाजी पंडितराव पवार DCP Shivaji Panditrao Pawar (अपर पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button