ताज्या बातम्या

जोशीची बायको पॉर्नस्टार’, सोसायटी सदस्यांना मेल, पुण्यातला धक्कादायक प्रकार


पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये एका इसमाने सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेला पॉर्नस्टार संबोधून ती चालायला आली आहे का? अशा आशयाचा मेल चक्क सोसायटीच्या 140 सदस्यांना पाठवला आहे.ही बाब त्या महिलेला कळल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेली असताना पीडित महिलेच्या नवऱ्यालाही या व्यक्तीने धक्काबुक्की करत, जा तुला काय करायचं आहे ते कर अशी धमकी दिली आहे.या प्रकारानंतर महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सोसायटी मध्ये राहणाऱ्या आरोपी शेखर धोत्रे याने ई-मेलवरून ” जोशी ची बायको पॉर्न एक्ट्रेस सारखी दिसते, पॉर्न ऍक्ट्रेस आली नाही का चालायला” अशी अश्लील शेरेबाजी असलेला मेल सोसायटीमधील 140 सदस्यांना पाठवून फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादी याबद्दल जाब विचारण्यास गेला असता फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की करून तुला पोलिसात जायचे तर जा पण मी बघून घेतो काय करायचे ते, अशी धमकी दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button