ताज्या बातम्या

‘मी तुला दिसलो का गाडीमध्ये झोपलेलो..’, राज ठाकरेंची अजित पवारांच्या स्टाईलमध्ये मिमीक्री


आज पनवेलमध्ये मनसेचा निर्धार मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोंडीवर बोलताना राज ठाकरेंनी भाजपसह अजित पवारांवर हल्लाबोल करत अजित पवारांची मिमिक्री केली आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली. त्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर अजित पवारांनी काल कोल्हापूरमध्ये बोलताना सांगितलं की, चौरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतो. त्यावर राज ठाकरेंनी मिमिक्री केली आहे.

मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष तयार करायला शिकावा,लोकांच्या गनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि ते लोक आतमध्ये गाडीमध्ये झोपून जाणार, ‘मी तुला दिसलो का गाडीमध्ये, झोपलो होतो का मी गाडीत, दिसलो का तुला? असं म्हणणार’, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री करून दाखवली आहे.

पुढे ते म्हणाले की, राज्यात सध्या निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे. सरकारमध्ये कशाला आले तर, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला, कशाला खोटं बोलताय असंही राज ठाकरे म्हणालेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button