ताज्या बातम्या

जोतिबा डोंगरावर यात्रेची जय्यत तयारी, कधी आहे यात्रा ? यंदा उच्चांकी गर्दीची शक्यता


यात्रेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच काही व्यापारी नारळ, मेवामिठाई यांचा माल भरू लागले आहेत.

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील (Jyotiba Temple) आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा येत्या २२ ऑगस्ट रोजी होत असून या यात्रेची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

Independence Day : कोल्हापुरात अजित पवार तर सोलापुरात हसन मुश्रीफ फडकवणार ‘तिरंगा’; शासनाकडून ध्वजवंदन यादी जाहीर
यंदा श्रावणषष्ठी यात्रा (Jyotiba Yatra 2023) पूर्ण क्षमतेने होत आहे, त्यामुळे या यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे. पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी डोंगरावर येऊन गल्लोगल्ली गटर्स स्वच्छता तसेच पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी पाहणी केली.

ज्या त्रुटी दिसल्या त्या दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. येत्या सोमवारी षष्ठी यात्रेची चौथी आढावा बैठक प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यातून सुमारे तीन लाख भाविक येतात. या यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे, ही यात्रा रात्रभर असते.

डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; काय आहे प्रकरण?
पहाटे धुपारती अंगारा होऊन यात्रेची सांगता होते. यात्रेसंदर्भात जोतिबा डोंगरावर पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, सरपंच राधा बुणे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या उपस्थितीत तीन आढावा बैठका झाल्या आहेत.

Vikram Pavaskar : स्वातंत्र्यदिनी तिरंग्याशेजारी आता भगवा ध्वजही उभारा; भाजप नेत्याचं धक्कादायक आवाहन, वादाची शक्यता
यात्रेच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच काही व्यापारी नारळ, मेवामिठाई यांचा माल भरू लागले आहेत. वाहनांचे पार्किंग करण्यासाठी दरवर्षी सपाटीकरण करण्यात येते. पण यंदा सलग पावसामुळे हे काम करताना अडचणी येत होत्या. मात्र, गुरुवारपासून पावसाने उघडीप दिल्याने हे काम सुरू झाले आहे. यात्रेत भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button