क्राईम

लैंगिक अत्याचार करुन ‘त्या’ चिमुरडीला संपवले


जळगावमधील भडगाव तालुक्यातील हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. गावातील तरुणानेच मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील असे 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर घटनास्थळाची पडताळणी करण्यासाठी पोलीस त्याला गावात घेऊन आले असता गावकरी संतप्त झाले. गावकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. तसेच पोलीस वाहनाचेही नुकसान झाले. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

काय घडलं नेमकं?

आठ वर्षाची चिमुरडी रविवारी आपल्या काकाच्या घरी टीव्ही पहायला गेली होती. त्यानंतर दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून ती घरी जेवायला निघाली. मात्र ती घरी पोहचलीच नाही. मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही म्हणून आई-वडिलांनी शोधाशोध सुरु केली. मात्र मुलीचा कुठेच थांगपत्ता लागेना. अखेर आई-वडिलांनी भडगाव पोलीस ठाणे गाठले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. पोलीसही दोन दिवस मुलीचा शोध घेत होते, मात्र मुलगी कुठेच सापडत नव्हती. मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

असा लागला शोध?

दरम्यान, दोन दिवसांनी स्वप्निल पाटील याच्या कडब्याच्या कुट्टीतून दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधी सुटल्याने लोकांनी तेथे जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्या कडब्याच्या कुट्टीत बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी तात्काळ याची माहिती देण्यात आली. कडब्याची कुट्टी स्वप्नील पाटील याच्या मालकीची असल्याने पोलिसांनी स्वप्नीलला संशयित ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच स्वप्नीलने गुन्ह्याची कबुली दिली.

मुलगी काकाच्या घरुन स्वतःच्या घरी जात असताना आरोपीने तिला आमिष दाखवून गोठ्यात बोलावले. मग सदर चिमुकलीवर आपण लैंगिक अत्याचार केला. अत्याचारादरम्यान मुलगी झटापट करत होती. या झटापटीतून मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. घटनास्थळाची पडताळणी करण्याकरता 50 ते 60 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आरोपीला गावात आणण्यात आले. आरोपीला पाहताच गावकऱ्यांना संताप अनावर झाला आणि गावकऱ्यांनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यसाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

आरोपीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीवर सध्या बलात्कार आणि हत्येचे कलम लावण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालानंतर आणखी कलम वाढवण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button