ताज्या बातम्या

९ आगस्टला क्रांती दिनी सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर रिपाइंचे जन-आंदोलन


९ आगस्टला क्रांती दिनी सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर रिपाइंचे जन-आंदोलन

सासवड : मा. उपअधीक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय तालुका पुरंदर जिल्हा पुणे , यांच्या भ्रष्ट कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी, व मौजे कोथळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील , सर्वे नं २२५ च्या २३ व्या हिस्स्यावर १८ ७० च्या इनामपत्र व कडवान पत्रावर असलेला समस्त महारवाडा हा अशी नोंद करण्यात यावी ,या मागणीसाठी, ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक ११ – ०० वाजता क्रांती दिनाचे औचित्य साधून, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पॅंथरनेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर जन- आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपाइं नेते, बळीराम सोनवणे यांनी दिली,

मौजे कोथळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील सर्वे नं. २२५ या क्षेत्रावर १८७० च्या इनामपत्र व कडवानपत्रावर समस्त महार म्हणून, ४ एकर २९ आर इतके क्षेत्र होते, व ० हेक्टर ३८ आर इतक्या क्षेत्रावर समस्त महारवाडा असा स्पष्ट उल्लेख असताना, सर्वे नं. २२५ ची फाळणी करताना, सदर क्षेत्राचे भूमी अभिलेख कार्यालयाने २३ हिस्से केले . यापैकी २२ हिस्स्यावर मुळ खातेदारांच्या वाली वारसांची नावे लावण्यात आली, परंतु २३ व्या हिस्स्यावर ज्या ठिकाणी समस्त महारवाडा असा ३८ आर क्षेत्रावर उल्लेख होता ,तो उल्लेख वगळून भूमी अभिलेख कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे, सदर ठिकाणी समस्त महारवाडा किंवा मुळ खातेदारांच्या सर्व वाली वारसांची नावे त्या ठिकाणी लावणे आवश्यक असताना, एक किंवा दोन जणांची नावे पुढे गटवारी नंतर झालेल्या गट नं. १८ या सातबारा सदरी लावण्यात आली आहेत, त्यामुळे, अनेक नागरीकांवर अन्याय झाला आहे, मौजे कोथळे ग्रामपंचायतीच्या दप्तरी , सर्व नागरीकांच्या घराची स्वतंत्रपणे नोंद करण्यात आली असून, तेथील सर्व नागरीक १९५५ पासून ग्रामपंचायत कर भरत आहेत, भूमी अभिलेख कार्यालयाच्या चूकीमुळे, या सर्व ग्रामस्थांवर अन्याय झाला असून, त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे काम देखील संबंधित व्यक्तीने तक्रार दिल्याने बंद करण्यात आले आहे,

त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या चूकीमुळे १८७० च्या इनामपत्र व कडवानपत्रावर उल्लेख असलेला समस्त महारवाडा ही नोंद फाळणी नकाशा स्किम बुक व गट नं १८ वर करून, या ठिकाणच्या सर्व नागरिकांना न्याय देण्यात यावा ,या मागणीसाठी व भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्ट कार्यप्रणालीची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी, मा.उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर दौंड यांच्या कार्यालयासमोर २० जून रोजी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले होते , परंतु मा.उपविभागीय अधिकारी पुरंदर दौंड यांनी आदेश देऊनही सदर विषयाबाबत भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने, अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, किंवा खुलासा दिला नाही, त्यामुळे, भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्ट कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी, व दप्तर दिरंगाई कायद्याची पायमल्ली करुन नागरीकांना वेठीस धरण्याच्या भूमिकेला लगाम घालण्यासाठी, व मौजे कोथळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील, गट नं‌. १८ फाळणी नकाशा व स्किम बुक यावर १८७० च्या इनामपत्रा प्रमाणे समस्त महारवाडा असा उल्लेख करण्यात यावा अथवा सर्व वाली वारसांची नावे लावण्यात यावीत या करीता, महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे सभापती विधान परिषदेच्या मा. उपसभापती निलमताई गोरे, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे, काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मा. जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्हा, मा अधिक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय पुणे जिल्हा , मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर दौंड ,मा तहसिलदार साहेब तालुका पुरंदर मा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय पुरंदर तालुका व मा.पोलीस निरीक्षक साहेब सासवड पोलीस स्टेशन यांना रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, व मौजे कोथळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील, बापूराव जगताप व लक्ष्मण जगताप यांच्या स्वाक्षरीने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,
एकीकडे शासन आपल्या दारी असा कार्यक्रम घेऊन, सरकार जनतेच्या दारी जाऊन, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र पुरंदर तालुक्यात आंदोलन करुनही अधिकारी याकडे डोळसपणे न पाहता शासन आपल्या दारी, या शासनाच्या धोरणाला बगल देऊन, दारी आलेल्या नागरीकांची कामे करीत नाहीत, म्हणून अशा दप्तर दिरंगाई कायद्याची पायमल्ली करुन जनतेची थटा करीत असलेल्या अधिकारी यांच्या कार्यप्रणालीचा जाहीर निषेध करण्यासाठी व मौजे कोथळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील नागरीकांच्या न्याय हक्कासाठी ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक ११ – ०० वाजता मा.उप अधिक्षक साहेब भूमी अभिलेख कार्यालय ता पुरंदर जिल्हा पुणे येथे जाहीर जन- आंदोलन करण्यात येणार आहे, तरी भूमी अभिलेख कार्यालया बाबत आपल्या तक्रारी असतील अशा नागरीकांनीही या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन ही रिपाइं नेते बळीराम सोनवणे यांनी केले आहे,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button