ताज्या बातम्या
क्रुझर ची दुचाकीला धडक दोघे युवक जागीच ठार
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/07/Screenshot_2023-07-29-16-40-37-45_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
दुचाकीने जाणार्या दोन युवकांना राजूर घाटाच्या पहिल्याच वळणावर क्रुझरने जोरदार धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना दि. 28 जुलै रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान घडली नांदुरा तालुक्यातील शिरसोडी येथील आत्माराम दुर्योधन भोलनकर वय वर्ष 30 व त्याचा मित्र महेश मारोती मुर्हेकर वय 35 हे बुलढान्याकडे जात असतांना बुलढाण्यावरून मोताळ्याकडे येणार्या क्रुझर क्रमांक एम एच 14 एच डी 0867 ने जोरदार धडक दिली.
त्यात दोन्ही युवकांच्या डोक्याला मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने आत्माराम भोलनकर व महेश मुर्हेकर हे दोन युवक घटनास्थळावर ठार झाले youths killed घटनेची माहिती मिळताच बोरा खेडी पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आले.