ताज्या बातम्या

भाविकांसाठी सज्ज होत आहे रामाची अयोध्या


रामाची अयोध्या. जर आपल्या डोळ्यांपुढे जुनी अनेक लहान-मोठी मंदिरे असलेली अयोध्यानगरी असेल तर एकदा नव्याने भेट द्या. कधीच आला नसाल तर हमखास अयोध्या बघण्यासाठी या.कारण अयोध्यानगरी बदलत आहे. मंदिरे आजही आहेत. पण अयोध्येतील जुने चिंचोळे रस्ते, विजेचा लपंडाव, पाणीप्रश्न हे चित्र बदलू लागले आहे. अयोध्येच्या या नव्या रुपाची कल्पना आपण याआधी कदाचित कधीच केली नसेल.

नव्या रुपातील अयोध्यानगरी म्हणजे एक वर्ल्ड क्लास शहर आहे. या अयोध्येत पंरपरा आणि संस्कृती जपत अनेक आधुनिक सोयीसुविधांची निर्मिती करण्यात आली आहे. लखनऊ, गोरखपुर, गोंडा या शहरांतून येणाऱ्यांसाठी प्रत्येकी 2 भव्य प्रवेशद्वारांची व्यवस्था करण्यात आली आहे. बरेली हायवेवर बायपास जवळ आणखी 1 भव्य प्रवेशद्वार बांधण्याचे काम सुरू आहे. अयोध्येत प्रवेश करताच राम जन्मभूमि येथे प्रवेश केल्याची जाणीव होईल. थोडक्यात जाणून घेऊ अयोध्येत काय बांधून झाले आहे आणि काय बांधले जात आहे? कशाप्रकारे अयोध्यानगरीचे रुप बदलत आहे?

लखनऊ, गोरखपुर, गोंडा या शहरांतून येणाऱ्यांसाठी प्रत्येकी 2 भव्य प्रवेशद्वारांची व्यवस्था
बरेली हायवेवर बायपास जवळ आणखी 1 भव्य प्रवेशद्वार बांधण्याचे काम सुरू
अयोध्या रेल्वे स्टेशनची नवी इमारत बांधून तयार
अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 90 टक्के काम पूर्ण, डिसेंबरपासून विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता
राम मंदिराजवळ भक्ती पथ, धर्म पथ, राम पथ आणि जन्मभूमि पथ या 4 मार्गांच्या निर्मितीचे काम सुरू
तब्बल 473 कोटी रुपये खर्चून पंचकोसी मार्ग तयार करण्याचे काम सुरू तसेच 1140 कोटी रुपये खर्चून चार मार्गिकांचा अर्थात फोर लेन असलेला 14 कोसी परिक्रमा मार्ग तयार करण्याचे काम सुरू
विमानतळावरून 15 मिनिटांत आणि रेल्वे स्टेशनवरून 20 मिनिटांत राम मंदिर परिसरात पोहोचता येणार
भाविकांसाठी, पर्यटकांसाठी राम रसोई येथे देशी तुपात शिजवलेल्या अन्नाची व्यवस्था केली जाणार
काशी येथून येणाऱ्यांसाठी अयोध्या जंक्शन, लखनऊ येथून येणाऱ्यांसाठी अयोध्या केंट आणि गोरखपूर येथून येणाऱ्यांसाठी रामघाट स्टेशन
मुख्य मंदिराचे काम सुरू आहे त्यामुळे सध्या मंदिरापासून 300 मीटर अंतरावर एका तात्पुरत्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे
पहिल्या टप्प्यात राम मंदिराचा ग्राउंड फ्लोअर अर्थात तळमजला भाविकांसाठी खुला केला जाणार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button