ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कीर्तनानंतर कीर्तनकाराचा हृदयविकाराने मृत्यू


गडहिंग्लज : कीर्तन संपल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने महेश भादवणकर (वय 62) या कीर्तनकारांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. त्यांनी आजच्या कीर्तनात ‘देह जावो अथवा राहो’ हा अभंग गायला होता.ते अविवाहित होते.



गडहिंग्लजला नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा आयोजित केला असून, यामध्ये दररोज कीर्तन करण्यात येते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता महेश भादवणकर महाराजांचे कीर्तन होते. कीर्तन संपल्यानंतर दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दिंडी प्रस्थान होणार असल्याने त्यांनी काही काळ थांबण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिक कळा येऊ लागल्याने तातडीने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गडहिंग्लज उपविभागातील अनेक गावांमध्ये ते कीर्तनासाठी प्रसिद्ध होते. महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायातून दुःख व्यक्त होत होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button