क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षात महिलेवर बलात्कार


मिंधे सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेलापूरहून गोरेगावला जात असताना रिक्षाचालकाने नुकतीच प्रसूती झालेल्या महिलेवर दिवसाढवळय़ा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना आरे कॉलनी परिसरात घडली. बलात्कारानंतर पळून गेलेल्या इंद्रजित सिंहला आरे पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला या गोरेगाव येथे राहतात. मे महिन्यात महिलेला तिच्या मावशीचा पह्न आला. पह्न आल्यावर तिने तिच्या तीन महिन्यांच्या मुलाला पतीकडे ठेवून त्या बेलापूरला गेल्या. दुपारी त्या सीबीडी बेलापूर कोर्ट येथे उतरल्या. काम झाल्यावर त्या पुन्हा त्याच रिक्षाने गोरेगावच्या दिशेने जात होत्या. महिलेच्या मावशीने रिक्षाचा नंबरचा पह्टो काढला होता. इंद्रजितने लघुशंकेचा बहाणा करून रिक्षा आरे कॉलनीच्या युनिट नंबर 18 जवळ नेली. तेथे कोणी नसल्याचा इंद्रजितने फायदा घेतला. पाणी घेण्याचा बहाणा करून तो रिक्षाच्या मागच्या बाजूला गेला. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढय़ावर न थांबता त्याने महिलेच्या पोटात लाथ मारली. लाथ मारल्याने महिलेच्या पोटातील टाके दुखू लागले. बलात्कार केल्यावर तो पळून गेला. त्या घटनेमुळे महिला घाबरली. महिलेला त्रास होऊ लागल्याने तिने याची माहिती तिच्या मावशीला दिली. त्यानंतर महिलेने आरे पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी इंद्रजितfिवरोधात गुन्हा नोंद केला. पोलिसांना त्या रिक्षाचा नंबर मिळाला. त्यावरून पोलिसांचे पथक नवी मुंबई येथे गेले. तेथे चौकशी केल्यावर इंद्रजित हा ती रिक्षा चालवत असल्याचे समजले. पोलिसांना इंद्रजितची माहिती मिळाली. तो कोपरखैराणे येथे असल्याचे समजताच पोलीस तेथे गेले. इंद्रजितला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button