ताज्या बातम्या

गळफास लावून प्रेमी युगुलाची आत्महत्या


धारणी तालुक्याच्या अगदी सीमेवर सातपुडाच्या जंगलात मध्यप्रदेशातील शेखपुरा गावाजवळ एका झाडावर एकाच दोराने दोन प्रेमींनी गळफास लावून आत्महत्या केल्याने मेळघाटसह बर्‍हाणपूर, खंडवा जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे.
प्रेमी युगुल आपसात आत्येभाऊ-मामेबहीण होते. दोघेही विवाहित पण होते.

धारणी तालुक्याच्या सीमेवर मध्यप्रदेशातील जामपानी गावातील रमेश धमसिंग (25) व विवाहित स्त्री या दोघांचे आपसात घनिष्ठ प्रेम होते. पण दोघे विवाहित असल्याने सारे काही लपून-छपून सुरू होते. काही दिवसापूर्वी गावातील लोकांनी दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलेले होते. नात्यात रमेशची अनिता मामेबहीण होती, (Lover couple suicide) हे विशेष. लोकलाजेमुळे दोघे अस्वस्थ होते. मात्र आपसातील प्रेम व स्नेह कमी झालेला नव्हता. अखेर दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. देडतलाई जवळच्या शेखपुरा (खकनार), जि. बर्‍हाणपूर गावालगतच्या जंगलात एका झाडावर एकाच दोरीने दोघांनीही गळफास लावून आपल्या जीवनाचा अंत केला. दोन दिवसापर्यंत घटनेची माहिती कोणालाच कळली नाही. मात्र 8 जुलै रोजी दोघे फासावर लटकलेले दिसून आले. मध्यप्रदेशातील देडतलाई पोलिस चौकीवर माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांना खाली उतरवून ओळख करून घेतली. महिलेच्या हातावर गावाचे नाव गोंदलेले होते तर रमेशच्या खिशात आधार कार्ड मिळाल्याने ओळख पटली.

म्हणतात ना प्रेम आंधळे असते. वय, नाते, भाषा,  समाज असे कोणतेही बंधन प्रेमात नसतेे. दोघे विवाहित असल्याने त्यांच्या प्रेमाला समाजात मान्यता नव्हती. अनैतिक म्हणूनच लोक त्यांच्या प्रेमाची चर्चा करायचे. परिणामी दोघांनी मरूनच सोबत राहण्याचा निर्णय घेतला. खकनार पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलेला आहे. घटनास्थळ धारणी तालुक्याच्या सीमेवर असल्याने मेळघाटात एकच चर्चा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button