या जिल्ह्यात 3207 डुप्लिकेट रेशन सापडली, पुरवठा विभागाच्या टोकाच्या निर्णयामुळं.
गोदिया : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात बनावट शिधापत्रिका असल्याचं अनेकदा उजेडात आलं आहे. ज्यावेळी असा प्रकार उजेडात आला आहे. त्यावेळी ती शिधापत्रिका अधिकाऱ्यांनी तात्काळ रद्द केली आहे.
त्याचबरोबर त्या व्यक्तीला शिक्षा सुध्दा देण्यात आली आहे. सध्या हा प्रकार महाराष्ट्रात (Gondia)अधिक वाढला असल्यामुळे, पुरवठा विभागाने रेशनकार्डची कसून चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे लोकांना जे काही रेशन मिळत, ते रेशन डब्बल मिळावं यासाठी बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आले होते. काही लोकांनी सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी रेशनकार्ड तयार केलं आहे. एकाचं घरात अनेक रेशन कार्ड असल्याचं ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेमुळे उजेडात आलं आहे. ज्यावेळी 3207 बनावट रेशनकार्ड सापडले. त्यावेळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला.
गोंदिया जिल्ह्यात सध्या जी काही कारवाई झाली आहे, ती कारवाई पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. यापुढे सुध्दा अशा पद्धतीने गोंदिया जिल्ह्यात बनावट रेशनकार्ड सापडल्यानंतर सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या कारवाईमुळे बनावट रेशनकार्ड असलेल्या लोकं चांगलीचं घाबरली असल्याची चर्चा देखील सुरु आहे.
वन नेशन-वन रेशनमुळे बोगसपणा आला पुढे…..
गोंदिया जिल्ह्यात काही रेशन कार्डधारकांनी डुप्लिकेट रेशन कार्ड बनवले असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यामुळे विभागाने रेशन कार्डाची छाननी करून या शिधापत्रिका तपासल्या, त्यावेळी दोषी आढळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या राज्यातून हंगामी कामासाठी रोजगाराच्या शोधात आलेले नागरिक महाराष्ट्रातही रेशन कार्ड बनवितात अशी सुध्दा माहिती या प्रकरणामुळे उजेडात आली आहे.