ताज्या बातम्या

चेन्नई आणि उपनगरात मुसळधार पाऊस


चेन्नई आणि त्याच्या उपनगरात रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, अधिकाऱ्यांनी सोमवारी शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. पावसामुळे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला. दोहा आणि दुबईच्या विमानांसह सुमारे 10 उड्डाणे बेंगळुरूकडे वळवण्यात आली.मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरासह लगतच्या जिल्ह्य़ात पडलेल्या कडक उन्हापासून पावसाने दिलासा दिला. पावसामुळे चेन्नई आणि शेजारील चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांबरोबरच वेल्लोर आणि राणीपेटमधील शाळांनाही अधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी शहर आणि उपनगरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button