ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहीण भावाच्या नात्याला काळिमा; तरुणाचा चुलत बहिणीवर बलात्कार


नागपुर:नागपुरात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवर तरुणाची नजर पडली.
नात्याचा विचार न करता त्याने आपल्याच चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणेच्या ३ महिन्यांनंतर ही स्थिती उघड झाली. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या तरुणाविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहते. ती इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी आहे. तिचा चुलत काका तिच्या घराशेजारी राहतो. ती सतत त्यांचा घरी ये-जा करत असे. काकाचा मुलगा महेश्वर (27) बी.कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तो त्याच्या चुलत बहिणीला १० वीपासून तिच्या अभ्यासात मदत करत होता. त्यामुळे ती नेहमी महेश्वरकडेच अभ्यास करत असे. एकत्र राहत असताना महेश्वरला तिच्यावर एकतर्फी प्रेम जळले होते. त्याने तिच्याकडे अनेकदा प्रेमाची मागणी केली. मात्र, आपण चुलत बहीण असल्याचे सांगून तिने त्याला वारंवार नाकारले. पण महेश्वरच्या नजरेतून ती हटत नव्हती. तो अनेकदा तिच्यासोबत अश्लील कृत्य करून बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असे. तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

महेश्वरचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात होता. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी त्याने रात्री ११ वाजता तिला घरी बोलावले. मध्यरात्रीनंतर कुटुंबीयांनी केक कापून महेश्वरचा वाढदिवस साजरा केला. रात्र झाल्यामुळे ती तिथेच थांबली होती. मध्यरात्रीनंतर महेश्वरने मुलीला शारीरिक संबंध करण्यास सांगितले. तिने नकार दिल्याने त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 2 मे रोजी मुलीने आईकडे पोटात दुखत असल्याचे सांगितले. यानंतर दोघेही मायलेकी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा मुलगी तीन महिन्यांची गर्भवती होती. डॉक्टरांनी माहिती देताच तीच्या आईचे भान हरपले. चुलत भावाने शारीरिक संबंध ठेवले हे उघड होताच तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button