ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना


शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. केवळ पावसाच्या जीवावर शेती करणे शक्य नाही.शेतीसाठी पाण्याचा साठा करावा लागतो. विहिर, तलाव, नदी हा प्राण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून वापरला जातो. शेतकऱ्यांना शेती करताना विहिरींची गरज भासते. परंतु विहीर खांदने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे का? कारण विहीर खांदण्यासाठी भरमसाठ पैसा लागतो. जो शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतो. या सर्वांचा विचार करता शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती पडीक ठेवावी लागू नये म्हणून विहीर खांदण्यासाठी अनुदान दिले जाते. तर मग जाणून घेऊयात कोणत्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळते आणि त्यासाठी अर्ज कसा करावा.



राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत विहिरींसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत जवळपास 3 लाख 87 हजार विहीर खोदण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांना 3 लाखांहून 4 लाख इतके अनुदान देण्यात येत आहे. तसेच अंतराची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने एक अर्ज सादर करावा लागेल. कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही माहिती जाणून घेऊयात.

पात्रता:
लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे. आवश्यक कागदपत्रे
७/१२ चा ऑनलाईन उतारा
८ अ चा ऑनलाईन उतारा
जॉबकार्डची प्रत
सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button