ताज्या बातम्या

भाजप खासदार हरिद्वार दुबे यांचे निधन


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार हरिद्वार दुबे यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांची किडनी निकामी झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निधनावर दु: ख व्यक्त केल आहे. (Haridwar Dubey Death)



माहितीनुसार, हरिद्वार दुबे हे बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डायलिसिसही होत होते. त्रास वाढल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे जतन करता आले नाही. ते आजारी असल्याची माहिती फक्त काही लोकांनाच होती. आग्रा येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button