पंतप्रधान मोदींचा डुप्लीकेट विकतोय पाणीपुरी; आवाजही मिळताजुळता व्हिडिओ पहाच !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत असतात. यापैकी काही फोटो, व्हिडिओ मजेशीर आणि मनोरंजक असतात. सेलेब्रिटीज, क्रिकेटर आणि राजकीय व्यक्तींसारखा चेहरा आणि पेहराव असलेल्या अनेक व्यक्तींचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

अशा पोस्टला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळताना दिसते. बऱ्याचदा या व्यक्तींचं एखादा सेलेब्रिटी, राजकीय किंवा क्रिकेटर्सच्या चेहऱ्याशी असलेलं साम्य थक्क करणारं असते. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका व्यक्तीचा चेहरा आणि पेहराव लोकांना संभ्रमात टाकताना दिसत आहे. या व्यक्तीचा चेहरा आणि पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा आहे

ही व्यक्ती गुजरातमध्ये पाणीपुरी विक्रीचं काम करते. एका व्यक्तीने मोदींसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल

 

केल्यावर नेटकऱ्यांकडून त्याला पसंती मिळताना दिसत आहे. अनेक युझर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. `नवभारत टाइम्स`ने याविषयीची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर सेलेब्रिटी, क्रिकेटर्स आणि राजकीय व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ही व्यक्ती ग्वाल्हेरमध्ये चाटविक्रीचं काम करते. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्यक्तीला पाहून नेटकरी काहीसे संभ्रमात पडले आहेत. ही व्यक्ती गुजरातमध्ये पाणीपुरी विकते. ही व्यक्ती अगदी मोदींसारखीच दिसते. तसंच त्यांचा आवाज पंतप्रधान मोदींच्या आवाजाशी 70 टक्क्यांपर्यंत मिळताजुळता आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.