क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! मुंबईत शिक्षिकेवर बलात्कार


मुंबई:13 मे रोजी हा गुन्हा घडला. आरोपीच वय 45 वर्ष आहे. पीडित महिला शिक्षिका आहे. आरोपी आणि पीडित महिला आधीपासून परस्परांचा ओळखत होते, असं पोलिसांनी सांगितलं. काय बहाण्याने आरोपी घरी घुसला?



घटनेच्या दिवशी आरोपी पीडित महिलेच्या घरी गेला होता. ट्युशन क्लासला फायनान्स करण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला. आरोपीने पीडित महिलेला सोबत नवी मुंबई येथे येण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने हे म्हटलं आहे.

अनैसर्गिक अत्याचार

पीडितने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती केली. तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळावरुन पळून जाण्याआधी त्याने पीडित महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केला. अचानक झालेल्या या प्रकाराने महिला हादरुन गेली. तिने चार दिवसानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

भारतीय दंड विधान सहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि 377 (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button