ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील आठ बसस्थानके ‘अ’ वर्गात


अहमदनगर: जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचा ‘अ’ वर्गात समावेश झालेला आहे. यामधील तारकपूर बसस्थानकातून बसच्या दररोज सर्वाधिक 1 हजार 776 फेर्‍या होत आहेत  याशिवाय 12 बसस्थानकांचा ‘ब’ तर नऊ बसस्थानकांचा ‘क’ वर्गात समावेश झाला आहे. स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानामुळे ग्रामीण भागातील 9 बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे.



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या अभियानाच्या स्पर्धेसाठी बसस्थानकांची ‘अ’ वर्ग (शहरी),’ब ‘ वर्ग (निम शहरी) आणि ‘ क ‘वर्ग (ग्रामीण) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. बसस्थानकांची वर्गवारी ही दररोज ये-जा करणार्‍यावर बसच्या संख्येवर ठरविण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचा ‘अ’ वर्गात समावेश होत आहे. यामध्ये तारकपूर, माळीवाडा, पुणे बसस्थानक, कोपरगाव, शिर्डी, जामखेड, श्रीरामपूर व संगमनेर या बसस्थानकांचा समावेश आहे.

पुणे बसस्थानकातून बसच्या दररोज 1 हजार 670, माळीवाडा 1 हजार 488, कोपरगाव 1 हजार 16, संगमनेर 924, शिर्डी 792, श्रीरामपूर 694 तर जामखेड बसस्थानकातून 520 फेर्‍या होत आहेत. ‘क’ वर्ग बसस्थाकांत जिल्ह्यातील नऊ बसस्थानकांचा समावेश आहे. यामध्ये बेलापूरसह राजूर, खर्डा, मिरजगाव, वांबोरी, सोनई, सुपा, राशीन, बाभळेश्वर या बसस्थानकांचा समावेश आहेत. बाभळेश्वर बसस्थानकातून बसच्या दररोज 212 फेर्‍या होत आहेत. बेलापूर बसस्थानकातून 196, राजूर 126, खर्डा 47, मिरजगाव 80, वांबोरी 108, सोनई 12, सुपा 52, राशीन बसस्थानकातून 88 फेर्‍या होत आहेत.

लोणी, कोल्हार ‘ब’ वर्गात

जिल्ह्यातील बारा बसस्थानकांचा समावेश ब वर्गात झालेला आहे. लोणी बु. बसस्थानकातून 494, अकोले 302, राहाता 216, नेवासा 424, पाथर्डी नवे 358, जुने 308, पारनेर 267, शेवगाव 463,कर्जत 350, राहुरी 308, कोल्हार 288 व श्रीगोंदा बसस्थानकातून 460 बसच्या फेर्‍या होत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button