ताज्या बातम्या

लग्नात उत्साहाच्या भरात गोळीबार करणं पडलं महागात, एकाचा मृत्यू


बिहार: सध्या लग्न सोहोळ्यातील कार्यक्रमांमध्ये उत्साहाच्या भरात बंदुकीच्या गोळ्या झाडण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. सध्या लग्नात गोळीबार केल्याच्या अनेक घटना समोर येत असताना अशाच बिहारमधील एका लग्नात गोळीबार झाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बिहारच्या छपरा येथे लग्नाच्या वरातीत उत्साहाच्या भरात गोळीबार करताना एका तरुणाचा गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. जलालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वेसारिया गावातील ही घटना असून वरातीदरम्यान बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील राजौली गावातील रहिवासी रमेश राय हा गोळीबारात ठार झाला. गोळी लागल्यानंतर रमेश याला कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये नेले परंतु डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषीत केले. यानंतर रमेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले व्यक्ती शवविच्छेदन न करता मृतदेह घेऊन फरार झाले.



मिळालेल्या माहितीनुसार, मृत रमेश राय हा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बनियापूरहून सर्वेसारिया जलालपूर गावात आला होता. लग्नाकच्या वरातीत वराच्या लहान भावाकडून जोरदार गोळीबार करण्यात आला होता. याचवेळी एक गोळी रमेशच्या प्रायव्हेट पार्टला लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेशला स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदर रूग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन न करता तो ताब्यात घेतला आणि तेथून निघून गेले. रुग्णालयातील डॉक्टर डॉ. संतोष कुमार यांनी घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले की, “रुग्णाला मृत अवस्थेत येथे आणले होते. त्याच्या कमरेला खाली गोळी लागली होती. आम्ही त्यांना पोलीस कारवाई आणि पोस्टमार्टम करण्यासाठी आग्रह करत होतो. परंतु ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रोखण्याचा प्रयत्न केल्यावर ते भडकले आणि मृतदेह तसाच उचलून घेऊन गेले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button