ताज्या बातम्या

परळीतील नागरीकांनी जल पुनर्रभरण करावे-मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे


परळीतील नागरीकांनी जल पुनर्रभरण करावे-मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे

परळी : येणाऱ्या हंगामात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवली तर पाणी टंचाईवर मात करता यावी यासाठी परळी शहरातील नागरीकांनी पावसाचे पाणी वाया जावुनये ते पाणी जमीनीत मुरुन पाणीपातळीत वाढ व्हावी यासाठी परळी शहरातील नागरीकांनी आपल्या कुपनलिका,घराचे छत,घरातील आड,विहीरींचे जल पुनर्रभरण करुन घ्यावे असे आवाहन परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.
पाणी हा आजचा ज्वलंत विषय आहे.परळी शहरात सध्या पाणीटंचाई नसली तरी येणार्या हंगामात पाऊस कमी झाला तर जमीनीतील पाणीपातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण यावर अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असते.शहरी भागात सर्वत्र सिमेंट काँक्रेटीकरणामुळे पाणी वाहून जाते.परिणामी जलपुनर्भरण होत नसल्यामुळे आज जमिनीची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. जलपुर्नभरणाची संकल्पना कृतीत येणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात सुलभ उपाय म्हणजे रेनवॉटर हॉर्वेस्टिंग या माध्यमातून जनजागृती करून इमारती, घरांच्या छतावर चे पाणी एकत्र साठवून शोष खड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवायला हवे परिणामी जलपुनर्भरण होऊन आसपासच्या विहिरी, कूपनलिका यांची जलपातळी वाढण्यास मदत होईल. पावसाळ्यात येत्या काळात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.पाणी बचतीसाठी उद्याच्या भविष्यासाठी परळीकरांनी जल पुनर्रभरण करुन घ्यावे असे आवाहन परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी केले आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button