ताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृध्दीवर महिला पोलीस निरीक्षक ठार; कर्मचारी,आरोपीही जखमी


वर्धा:हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला. त्यात पोलीस निरीक्षक रेखा चव्हाण यांचा मृत्यू तर सहायक पोलीस उप निरीक्षक



अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

सुखविंदर्सिंग मिठ्ठू जगड़ा, चालक शम्मी कुमार, आरोपी वैद्यनाथ शिंदे हे जखमी झालेत.जखमींना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या शिंदे यास नागपूरला नेण्यात येत होते.या पोलीस वाहनाने पुढे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे पोलीस वाहनाचा चेंदामेंदा झाला. सावंगी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. अपघाताची माहिती होताच सावंगी व जाम महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button