ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक घटना; मुलीची हत्या करून वडिलांची आत्महत्या


मुंबई: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होत असलेल्या वादातून ४३ वर्षीय स्टॉक ब्रोकरने ११ वर्षीय मुलीची गळफास लावून हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लालबाग परिसरात मंगळवारी घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लालबाग येथील गणेश गल्लीतील विमावाला महाल येथील रुम क्रमांक १६ मध्ये पवार कुटुंबीय राहण्यास आहे. भूपेश पवार हे मुलगी आर्या आणि पत्नी भाग्यश्रीसोबत राहण्यास होते. दोघांच्या लग्नाला बारा वर्षे झाली. घराजवळच असलेल्या एका खासगी फर्ममध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून नोकरी करत असलेल्या भाग्यश्री मंगळवारी सकाळी कामावर गेल्या. तासाभराने त्यांनी भूपेशला फोन केला. परंतु, त्याने उत्तर दिले नाही. संशय आल्याने त्या घरी आल्या तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता, मुलगी आणि पती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांना धक्का बसला. पोलिसांना घटनास्थळावरून भूपेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली आहे. पत्नीच्या त्रासामुळे हे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पाच दिवस आधीच लिहिली सुसाइड नोट
 पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या सुसाइड नोटवर २० एप्रिल तारीख नमूद आहे.
 त्यामुळे त्याने पाच दिवस आधीच सुसाइड नोट लिहून ठेवल्याचा संशय आहे.
 पुढील तपासासाठी सुसाइड नोट हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठविण्यात आली आहे.

म्हणून भाग्यश्रीने माहेर गाठलं…
भूपेश आणि भाग्यश्री दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात सतत खटके उडायचे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री माहेरी राहण्यास गेली. मात्र, दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्थी केल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button