ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नात्याला काळिमा फासणारी घटना; सावत्र भावानेच केला वहीनीचा खुण


सविंदणे :आंबळे ता. शिरूर येथे अनिल बाळासाहेब बेंद्रे या सावत्र भावाने त्याची वहीनी प्रियंका सुनिल बेंद्रे हीचा व्यायाम करण्याच्या लोंखडी डंबेल, चाकु व विटाणे मारुन निघृन खुण केला असून त्याचा भाऊ सुनिल बाळासो बेंद्रे याला गंभीर जखमी केले आहे.
तर गुन्हा करुन पळून जात असताना गाडीला धडकून आरोपी अनिल बेंद्रे हाही ठार झाला आहे.

या बाबत मुलांचे वडील बाळासाहेब पोपट बेंद्रे (वय ५९ ) यांनी शिरूर पोलिस स्टेशनला आरोपी अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५ ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब बेंद्रे यांचाथोरला मुलगा सुनिल व सुन प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. १ में रोजी ते लंडनला जॉबसाठी येथे जाणार होते. तसेच दुसरा मुलगा अनिल हा पुणे येथे कंपनीत काम करत होता, मात्र त्यांच्या वागण्यामुळे तीन कंपण्या त्याला बदलाव्या लागल्या, काही महिन्यापूर्वी त्याचे कंपनीतील काम गेल्यामुळे, तो वैफल्यग्रस्त झाला होता.

त्यामुळे व्यसनाधिन झाला होता. तो पुण्यातुन गावाला आला, या कंपनीचे त्याचे काम त्याचा भाऊ सुनील याच्यामुळे गेले असा त्याचा समज होऊन मनात राग होता. गावाला येऊन तो सतत आई वडील यांच्याशी भांडणे करीत असल्यामुळे ते मिटवण्यासाठी वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील व सून प्रियांका यांना गावाला आंबळे येथे बोलविले होते. सोमवारी रात्री याबाबत दोन्ही भावांमध्ये सविस्तर चर्चा झाली, त्याला समजूनही सांगितले. जेवण केल्यानंतर प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले होते. वडील पोर्च मधे तरअनिल घरात झोपला होता. पहाटे साडे चारच्या सुमारास अचानक आरडा ओरडा ऐकायला आल्यामुळे वडील बाळासाहेब हे वर पाहण्यासाठी गेले त्यावेळेस अनिल हा प्रियांका व सुनिल यांना मारत असल्याचे असल्याचे पाहिले.

अनिलने चाकू व लोखंडी डंबेलने प्रियंका व सुनील याच्यावर निर्गुणपणे वार केले आहे . प्रियंका हिला मोठ्या प्रमाणात वार केल्यामुळे प्रियांका हिचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील याला पुणे येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपी अनिल हा पळून मोटार सायकलवर पळुन जात होता त्याने स्वतःची मोटर सायकल घेऊन पळून जात असताना न्हावरे – चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली, त्यात तोही ही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ससून येथे उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला असल्यांचे पोलिसांनी सांगितले. सुनिल यांचीही तब्बेत गंभीर असुन त्यांच्या छातीवर चाकुचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे.

प्रियांका यांच्या छातीवर चाकुचे वार तसेच डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. प्रियांका यांच्या छातीवर खोलवर चाकुने पाच वार केले असुन , बचाव करीत असताना उजव्या हातालाही चाकुच्या जखमा आहेत. पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.

त्यांचे स्वप्न अधुरेच राहीले.. सुनिल व प्रियांका हे दोघेही आय टी इंजिनिअर होते, त्यांचे लग्न दोन वर्षापुर्वी झाले होते. त्यांना लंडन येथे जॉब करण्याची संधी मिळाली होती त्यामुळे ते खुप आनंदात होते . १ में रोजी ते जाणार होते मात्र काळाने दुर्देवी घाला घातला अन् सुखी संसाराचे स्वप्न अपूर्ण राहीले अशी प्रतिक्रिया प्रिंयाकाचे भाऊ स्वप्निल सयाजी भोसलकर ( वाघोली) यांनी भावना व्यक्त केली.
चौकट-२
शिरूर पोलिस स्टेशनहद्दीत खुणासह जीवे मारण्याचा प्रयत्न, दुचाकी चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, वारंवार होत असून याला आवर घालण्यासाठी पोलिस प्रशासण अपयशी ठरले आहे. तसेच एका महीन्यापुर्वी दिपक नागरे या पोलिसावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यातील आरोपी अद्याप निष्पण झालेले नाही. त्यामुळे शिरूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button