क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना


नाशिक:लखमापूर येथील सख्ख्या पित्याने आपल्या सतरावर्षीय मुलीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पित्यास गुरुवारी (दि  २०) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लखमापूर येथील शेतशिवारात राहणाऱ्या साक्षी अनिल ठाकरे (१७) या युवतीचा विजेचा धक्का लागून आकस्मिक मृत्यू झाल्याची खबर मंगळवारी (दि. १८) सटाणा पोलिसांना देण्यात आली होती. परंतु याबाबत संबंधित मुलीचा तिचे वडील अनिल खंडू ठाकरे (४६) यांनीच खून केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपास केला.

त्यावेळी मयत मुलीच्या गळ्यावर व्रण असल्याचे लक्षात आले. व्रण लक्षात येऊ नये यासाठी गळ्यावर पावडर लावल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी पित्यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता मुलगी दोन वेळा न सांगता प्रियकराच्या घरी गेली आणि त्यामुळे गावात बदनामी झाली, याचा राग ठेवून पित्याने हे कृत्य केल्याचे पुढे आले.

आराम नदीपात्रात मृतदेह

शहराजवळील आरम नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. आरम नदीकाठाजवळ अहिल्याबाई चौक परिसरात एका ३० ते ३५ वर्ष वयोगटातील पुरुष जातीचे अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आले आहे. संबंधिताच्या अंगात राखाडी रंगाचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाची फुले आहेत तसेच राखाडी रंगाची जीन्स पॅन्ट घातली असून, अंगात लाल रंगाचे बनियान आहे. मयताची ओळख पटलेली नसून त्याचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात राखून ठेवण्यात आला आहे. संबंधित वर्णनाशी ओळख पटत असल्यास सटाणा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button