ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेलमधील भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आरोपीचं भलतच धाडस


नागपूर: नागपूर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांविरोधात पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.  अशात पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक नसल्याची घटना समोर आली आहे. कारागृहात कैद असलेल्या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मकोकाचा आरोपी आला होता. या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे प्रकरण? नागपूर शहरात गुंडाच्या मनात पोलिसांचा वचक नसल्याचं पुन्हा एकदा समोर आल आहे.

आरोपी रोशन मेश्राम हा कुख्यात गुन्हेगार असून मकोकाचा आरोपी आहे. त्याचाच एक गुंड साथीदार आशू सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तुरुंगातील भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोशनने तुरुंगाच्या बाहेर फोडायला फटाके आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार रोशनने तुरुंगाच्या गेटवर फटाके फोडले आणि पळून जात असताना धंतोली पोलिसांनी नाकाबंदीमध्ये रोशनला पकडले.

पोलिसांनी झडती घेतली असताना त्याच्याकडे एक चाकू देखील सापडला. रोशन पळून जात असलेल्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार रोशन वर गुन्हा दखल केला असून धंतोली पोलीस पुढील तपास करत आहे. डोक्यात दगड घालून रिक्षा चालकाची निर्घृण हत्या नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास गुजरात हॉटेल समोर एका दुकानाच्या पायरीवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या तरुणाची अज्ञात आरोपीने डोक्यावर दगड मारून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. राजकुमार यादव (वय,32) असे मृताचे नाव असून तो ऑटो चालक असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या बाबतचा अधिक तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत. तरुणाची हत्या कोणी केली, या हत्येचे कारण नेमके काय याबाबतचे गुढ कायम असून हत्येचा सखोल तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button