ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंहगडावर वीज कोसळली, घाटरस्त्यावर दरडही पडली


खडकवासला : जोरदार वारे व विजांच्या कडकडाटासह सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने सिंहगडपरिसराला झोडपले. दुपारी चारच्या सुमारास सिंहगडावरील वाहनतळावरील एका झाडावर वीज कोसळली तसेच घाट रस्त्यावर उंबरदाड वळणावर दरड कोसळली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.



सिंहगड वन विभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले की, वाहनतळावर सिंहगड हॉटेलसमोर असलेल्या झाडावर वीज कोसळली. यामुळे या झाडाचे मधोमध दोन भाग झाले आहेत. विजेचा मोठा लोळ कडकडाटासह झाडावर कोसळताना मोठा आवाज झाला. त्यामुळे वाहनतळाला जोरदार हादरे बसले.

पुणे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून किल्ल्याच्या परिसरात वादळी पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी गडावरील आकाशवाणी केंद्राच्या मनोर्‍यांजवळील एका झाडावर वीज कोसळली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button