ताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवजात अर्भकाला फेकले हॉस्पिटलच्या खिडकीतून; १९ वर्षीय तरुणीचे धक्कादायक कृत्य


पुणे: सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अविवाहित तरुणीने टॉयलेटमध्ये जाऊन एका मुलीला जन्म धक्कादायक बाब म्हणजे तिने त्या नवजात अर्भकाला बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यात त्या अर्भकाचा मृत्यू झाला.हा प्रकार नऱ्हे येथील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी नंदा ढवळे (वय ६२, रा. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी १९ वर्षीय तरुणी मानाजीनगर येथील हॉॅस्टेलमध्ये राहते. ती ८ महिन्यांची गर्भवती होती. तिने ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली होती. पोटात दुखू लागल्याने ती जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये आली. पाठीचे दुखणे व अशक्तपणाची तक्रार तिने केली. त्यानंतर ती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील पेशंटच्या टॉयलेटमध्ये गेली. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यू झाला. या तरुणीवर गुन्हा दाखल केला असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे़ पोलिस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button