ताज्या बातम्या

जयभीम महोत्सवात समाजाभिमुख उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा बीड तहसीलदारांच्या हस्ते झाला भव्य सन्मान.


जयभीम महोत्सवात समाजाभिमुख उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा बीड तहसीलदारांच्या हस्ते झाला भव्य सन्मान.शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना कार्यालयात जयभीम महोत्सव सन्मान सोहळा संपन्न.

महामानव, भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२‌व्या जन्मदिनाच्या औचित्याने शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या संकल्पनेतून दि.०६/०४/२०२३ ते १४/०४/२०२३ या कालावधीत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, दिव्यांग व्यक्तींना भारतीय संविधानाचे महत्व विशेद करून सांगणे व दि.१५/०४/२०२३ पासुन शासनाच्या वतीने प्रारंभ होणार्या शासकीय योजनेच्या जत्रेत योजनेचा लाभ मिळण्याकरिता दिव्यांग व्यक्तींना सहभागी होण्यास प्रवृत्त करणे इत्यादी समाजाभिमुख उपक्रमांचा जयभीम महोत्सवात समावेश होता. तर या जयभीम महोत्सवाचा समारोप तहसील मधील दिव्यांग कर्मचारी संघटना कार्यालयात संपन्न झाला. संपन्न झालेल्या जयभीम महोत्सवात कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बीड येथील प्रभारी तहसीलदार श्रीयुत सुहासजी हाजारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आठवले यांनी करतांना सांगितले की, समाजाभिमुख व शोधपत्रकारीतेतील पत्रकारांचा सन्मान करणे व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हिच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दैनिक स्वरुपात भावपूर्ण मानवंदना ठरेल. तसेच याच कार्यक्रमात रोटरी क्लब बीड मार्फत सन्मानित असलेल्या बीड गानकोकिळा सै.प्रिया अशोक आठवले यांनी आपल्या बहारदार आवाजाने भीमगीत गाऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भीमगीत गायना नंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्षस्थानी असलेले बीड प्रभारी तहसीलदार श्रीयुत सुहासजी हाजारे यांनी पत्रकारीता क्षेत्रात अव्याहत पत्रकारिता करणार्या दै.सकाळ वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी श्रीयुत दत्ता देशमुख व राष्ट्रीय पब्लिक युट्यूब वाहिनीचे संपादक श्रीयुत सुनिल जाधव या जेष्ठ पत्रकारांचा यथोचित सन्मान केला. पत्रकारांना सन्मानित करतांनाच कु.सविता आकोसकर यांना भारतीय संविधान देवुन यथोचित सन्मानित केले.तसेच महामानवाची प्रेरणा घेऊन समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेने तहसीलदारांनी सन्मानित केले.या सन्मानार्थीमधे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले, शरद झोडगे, प्रविण पालीमकर, संदिप गांडगे, शितल निकाळजे, सविता आकोसकर, तत्वशिल कांबळे, अशोक तांगडे, उत्तम ओव्हाळ, डॉ.शेख मुबारक, स्वाती चव्हाण, कु.प्रतिक्षा आठवले या सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान झाला व या जयभीम महोत्सवाची सांगता संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने झाली.या स्वरूपाची माहिती शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वय जनहितार्थ दिली आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button