ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायकोने ‘बलात्कार’ केला; पतीची कोर्टात धाव


गुजरात:गुजरातच्या सुरतमध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरुद्धच बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी स्थानिक न्यायालयात धाव घेतली आहे.
लग्न करतेवेळी पत्नीने पहिल्या लग्नाची बाब लपवून ठेवली, तसेच लैंगिक संबंध ठेवण्यासाठी फसवणूक करून संमती मिळवली, जे बलात्कारासारखे आहे, असे पतीने न्यायालयात सांगितले.कमलेशचे २०१० मध्ये सरला (दोघांचेही नाव बदललेले) सोबत लग्न झाले. दोघांना दोन मुलेही आहेत. २०१९ मध्ये कमलेशने सरलाच्या फोनवरील मेसेज वाचल्यावर त्याला संशय आला. त्याने चोरून तपास केला आणि पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा निष्कर्ष काढला. सरलाने पहिल्या लग्नानंतर घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचे त्याला कळले. मग त्याने आपल्या लहान मुलाची डीएनए चाचणीही केली, पण ती देखील न जुळल्याने दोघांमधील संबंध अजूनच बिघडले आणि ते वेगळे झाले.

यानंतर पतीने संपूर्ण प्रकरणी बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर पतीने न्यायालयात धाव घेतली. पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची आमची मागणी आहे असे कमलेशच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले. मंगळवारी आणखी कागदपत्रे सादर करण्यासाठी त्याने न्यायालयाकडे वेळ मागितला, त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणी ६ मे रोजी ठेवली आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button