वर्धा जिल्हा परिषद यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात अव्वल..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वर्धा : प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्तम काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार योजनेंतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कार योजनेत मुल्यमापन वर्ष २०२१-२२ मध्ये वर्धा जिल्हा परिषद नागपूर विभागात अव्वल ठरली आहे.

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
ग्रामीण महराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे योगदान मोठे आहे. राज्यामधील विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबविल्या जातात.

या संस्थांच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यासाठी विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास क्षेत्रात यशवंत पंचायतराज हा सर्वसमावेशक पुरस्कार असल्याने अत्यंत महत्वाचा समजला जातो. शाश्वत विकास ध्येयांचे निकष व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी केलेली प्रगती विचारात घेवून यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ (मुल्यमापन वर्ष २०२१-२२) राबविण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती यांनी सहभाग घेतला होता. या अभिनव उपक्रमामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेने विविध विभागामार्फत वर्षभर राबविलेल्या शासनाच्या योजनांवर आधारीत मुल्यमापन केले गेले.
विभागस्तरीय समितीने जिल्हा परिषदेला २ मार्च रोजी भेट देवून जिल्हा परिषदेने केलेल्या मुल्यमापन प्रतवारी अहवालाची तपासणी केली. विभागस्तरीय समितीने केलेल्या तपासणीमध्ये जिल्हा परिषदने नागपुर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. नागपुर विभागातून प्रथम क्रमांकावर आल्यामुळे राज्यस्तरावरुन होणाऱ्या मुल्यामापन स्पर्धेकरीता जिल्हा परिषद पात्र झाली. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तपासणी चमुने २८ मार्च रोजी जिल्हा परिषदेला भेट देवुन विभागस्तरीय समिनीने सादर केलेल्या मुल्यमापन प्रस्तावाची तपासणी केले व तपासणी अहवाल शासनास सादर केला आहे.
सदर अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या व अंतिम निवड केलेल्या पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना राज्यस्तरावर त्यांना मिळालेल्या प्रतवारीनुसार रोख स्वरुपात तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. नागपुर विभागातून वर्धा जिल्हा परिषद अभियान सन २०२२-२३ (मुल्यमापन वर्ष २०२१-२२) यामध्ये प्रथम क्रमांकावर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन केले

लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !