बोरांच्या आकाराच्या गारांनी शहर परिसराला झोडपले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बुलढाणा : आज संध्याकाळी बुलढाणा शहर परिसराला मुसळधार पावसासह तुफानी गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडालीसंध्याकाळी चार वाजता सुरू झालेला हा निसर्गाचा झंझावात पंधरा मिनिटे सुरू होता. प्रारंभी पावणेचार वाजता सोसाट्याचा वादळी वाऱ्याने हजेरी लावली. रस्त्यावरील वाहनचालक व पादचारी सुरक्षित जागा शोधेपर्यंत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोबतीला विजेचा कडकडाट असताना अचानक गारपिटीला सुरुवात झाली. बोराच्या आकाराच्या गारीने पाचेक मिनिटे शहर परिसराला झोडपले. सुमारे पंधरा मिनिटे निसर्गाचे हे थैमान सुरू होते.