ताज्या बातम्या

भावाशी भांडली अन् मोबाईल गिळला; डॉक्टरही पडले बुचकळ्यात


मध्य प्रदेश:मध्य प्रदेशात भावाशी झालेल्या भांडणामध्ये एका 18 वर्षीय मुलीने मोबाईल गिळल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये ही घटना घडली असून या मुलीला तातडीने शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आलं.दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या पोटातून मोबाईलही बाहेर काढण्यात आला आहे.



मुलीने मोबाईल फोन गिळताच तिला तीव्र वेदना होऊ लागल्या. तसंच तिचा अशक्तपणाही जाणवू लागला होता. त्यानंतर तिला शुक्रवारी ग्वाल्हेरच्या जैरोग्य रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यात आली.

तपासणीनंतर ही घटना उघडकीस आली आणि घडलेल्या प्रकाराने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचंही डॉकटरांनी सांगितलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button