जनावरांना साप्ताहिक सुटी,१०० वर्षांपूर्वीची आहे परंपरा !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जनावरांना साप्ताहिक सुटी देण्याची या गावांमधली परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे. अके दिवशी नांगराला जुंपत असतानाच एका बैलाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू का झाला, यावर पंचायत बसली. गरजेपेक्षा जास्त थकवा आणि कामाच्या ताणामुळे बैल मरण पावला, असं कारण पुढे आलं. त्यानंतर येथील पंचायतीने आठवड्यातून एक दिवस जनावरांना सुटी देण्याचा एकमताने निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरु आहे.

कुठे दिला जातो विकली ऑफ?

झारखंड राज्यातील लातेहार जवळील जवळपास २० पेक्षा जास्त गावांमध्ये ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. इथे गाय-बैल किंवा इतर जनावरांकडून रविवारी काम करून घेतलं जात नाही. त्या दिवशी त्यांचा विकली ऑफ समजा. विश्रांती दिली जाते. आठवडाभराचा थकवा घालवण्यासाठी, त्यांना ताजंतवानं होण्यासाठी..

अनेक जन्मांपासूनचं नातं…

लातेहारमधील गावकऱ्यांच्या मते, मनुष्य आणि प्राण्यांच अनेक जन्मांपासूनचं नातं आहे. भारतीय संस्कृतीत याचे अनेक दाखले आहेत. आपले अनेक सण-उत्सवदेखील पशु-प्राण्यांशी जोडलेले आहेत. गायी-गुरांच्या मेहनत आणि सहकार्यामुळेच जगात माणसांची भूक भागली जाते. त्यामुळे एवढी मेहनत घेणाऱ्या गायी गुरांना आठवड्यातून एक दिवस सुटी दिलीच पाहिजे. लातेहार जिल्ह्यातील हरखा, मोंगर, ललगडी आणि पकरारसह इतर अनेक गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते.