पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार; चौघांना अटक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे: घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या संदर्भात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी चौघांना अटक झाली आहे.
घरगुती सिलेंडर मधून गॅस चोरणाऱ्या चार आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांकडून 114 गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या काढून व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमधील हे मोठं रॅकेट आता समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा रॅकेट उघडकीस आणलं आहे. पुणे गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे.