मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट, यंदा पाऊस कसा राहणार?
मुंबई: देशभरात मागच्या 4 वर्षांत 2019 आणि 2021 साली जोरदार पाऊस झाल्याने बऱ्याच राज्यांची परिस्थिती बिकट झाली होती. आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपूरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, या राज्यात पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान मागच्या वर्षी 2022 साली हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा इशारा दिला होता. यंदाही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. परंतु या पावसावर अल् निनो वादळाचा प्रभाव होण्याची शक्यता आहे.
मागच्या दोन वर्षांपासून अल निनो वादळ सक्रीय असल्याने याचा परिणाम पावसावर होत असतो. यंदाही प्रशांत महासागरात अल- निनो सक्रिय झाल्याचे हवामान खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु भारतात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसेल असाही अंदाज देण्यात आला आहे. अल-निनो असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागच्या तीन वर्षांत ला-निनो या वादळाचा प्रभाव होता. परंतु यंदा 2023 साली अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मात्र मे 2023 पर्यंत अल-निनोची स्थिती न्यूट्रल, जून, जुलैमध्ये साधारण, ऑगस्टमध्ये थोडा सक्रिय असेल, तर त्यानंतर तो अधिक प्रभावी तर पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.
जागतिक हवामान विभागाकडून भारतात जून, जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 50 टक्के कमी पाऊस होईल. दरम्यान अल-निनो ऑगस्टनंतर सक्रिय होण्यचाी शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जुलैपर्यंत अधिक असल्याने बंगालची खाडी व अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा फायदा मिळतो. त्यामुळे 90 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांच्या मते भारतीय मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. अशक्त, मध्यम आणि सशक्त अशा स्वरूपात अल-निनोची सक्रियता असते. 1950 पासून 20 वेळा अल-निनो वर्ष आले. या वर्षात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. 5 तीव्र अल-निनो वर्षात अत्यंत कमी पाऊस पडला.