नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार एक गंभीर जखमी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नारायणगाव : नगर-कल्याण महामार्गावरील वाटखळ गावाजवळ इनोव्हा आणि पिकअप टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.इनोव्हा गाडी (क्रमांक एम एच ०५ ए.एस ६३३७ ) व मालवाहू पिकअप टेम्पो ( क्रमांक एम एच १४ जी.डी ४०७४ ) या वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांची पोलीस पथकासह घटनास्थळी गेले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना ओतूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले , मात्र त्यातील पाच जणांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रात्री ९ वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळे गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडली आहे.इनोव्हा गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.