Video:छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांधांकडून हिंदू आणि पोलीस यांच्यावर आक्रमण..
- पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ * पोलिसांचा हवेत गोळीबार !
- २ पोलिसांसह ६ जण घायाळ ! * ४ घंटे धर्मांधांचा हैदोस !
शहरात धर्मांधांनी पोलिसांची जाळलेली वाहने सनातन मराठी ने या बाबतचे व्रत्त प्रकाशीत केले आहे
छत्रपती संभाजीनगर – शहरात श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर किराडपुरा येथील श्रीराममंदिरात सिद्धतेसाठी जमलेल्या हिंदूंसमवेत धर्मांधांच्या एका गटाने काही कारण नसतांना वाद घातला. त्यानंतर काही क्षणातच धर्मांधांनी परिसरात दंगल पेटवली. अनियंत्रित झालेल्या धर्मांधांच्या गटाने पोलिसांवरही आक्रमण केले. पोलिसांसह इतर वाहनांवर दगडफेक करून ती वाहने जाळण्यात आली. या आक्रमणात २ पोलिसांसह ५ ते ६ जण घायाळ झाले आहेत. ३० मार्चच्या पहाटे ३.३० वाजेपर्यंत धर्मांधांचा हिंसाचार चालू होता. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (प्रत्येक वेळी श्रीरामनवमी किंवा हिंदूंचे इतर सण यांच्या काळात धर्मांधांकडून राज्यातच आणि देशात अकारण दंगल घडवणे, हे नित्याचेच झाले आहे. आतापर्यंत दंगेखोर धर्मांधांवर कठोर कारवाई न केल्यामुळे ते डोक्यावर बसले आहेत. धर्मांध पुन्हा दंगल पेटवण्याचे धाडस करणार नाहीत, अशी कारवाई पोलीस करतील काय ? – संपादक)
यह देखिए दंगाई जिहादियों ने जलायी गई निजी एवं सरकारी गाड़ियों को, #छत्रपति_संभाजीनगर पुलिस ही सबूतों को रातों रात क्यों मिटा रही है ? श्री राम मंदिर पर हमला करने वाला कोई पकड़ा क्यों नहीं गया ? #SambhajinagarTempleAttack 2
pic.twitter.com/MzCxLcWMti— Dr. Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) March 30, 2023
शहरात तैनात असलेला पोलिसांचा बंदोबस्तलोकप्रतिनिधींशी चर्चा करतांना पोलीस अधिकारीश्रीराम मंदिराच्या बाहेर जमलेले हिंदू
३० मार्च या दिवशी साजरा होणार्या श्रीरामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुरा येथील श्रीराममंदिरातही जय्यत सिद्धता चालू होती. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हिंदु धर्मीय आणि धर्मांध यांच्यात वाद चालू झाला. (पूर्वनियोजित दंगली ! – शहरात दंगल घडवण्यासाठीच धर्मांध जाणीवपूर्वक हिंदूंशी वाद घालून दंगल पेटवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
श्रीराममंदिराबाहेरील कमान आणि पोलीस यांचे वाहन जाळले !
१. प्रथम बाचाबाची होऊन वाद वाढला. शिवीगाळ चालू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणा चालू झाल्या.
२. काही क्षणातच धर्मांधांच्या एका गटाने मंदिराच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही हिंदू मंदिरात घुसले. धर्मांधांनी त्यांच्यावरही आक्रमण केले.
३. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव कुमक मागवली; मात्र ती येईपर्यंत जाळपोळ चालू झाली होती.
४. धर्मांधांनी अनेक हिंदूंच्या घरांवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या.
५. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले.
६. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरूंना बोलावण्यात आले; पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या सिद्धतेत नव्हता.
७. शेवटी पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत झाला नाही. त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
८. काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी आला; मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले.
९. नंतर अग्नीशमन विभागाच्या वाहनांतून पाण्याचा मारा करण्यात आला. (आतापर्यंत काँग्रेस आणि पोलीस यांनी धर्मांधांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करून त्यांना झुकते माप दिल्याने धर्मांध मुसलमान पोलिसांच्या कारवाईला जुमानत नाहीत, हे त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होते. पोलिसांची वाहने जाळायलाही धर्मांध मागे-पुढे पहात नाहीत, तिथे सामान्यांचे काय ? – संपादक)
आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत रस्ता बंद !
स्थानिकांच्या माहितीनुसार जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार २-३ वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. शहरातील आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व मार्ग पोलिसांनी बंद केले.
या वेळी बहुतांश हिंदूंच्या घरांवर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होेते. रात्री ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालू होते. घटनेनंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सैनिकांसह किराडपुरा परिसरात पहाणी केली.
दंगेखोरांना पकडण्यासाठी ८ ते १० पथके बनवणार !
छत्रपती संभाजीनगर येथे वातावरण आता शांततापूर्ण असून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. ‘दंगेखोरांवर कडक कारवाई केली जाईल’, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे, तसेच ज्या दंगेखोरांनी रात्री किराडपुरा येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पकडण्यासाठी पोलीस ८ ते १० पथक सिद्ध करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (जर दंगेखोर धर्मांधांवर कठोर कारवाईच होत नसेल, तर नुसती पोलिसांची पथके बनवण्यात काय अर्थ ? वेळोवेळी हिंसाचार घडवणार्या धर्मांधांवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई केली असती, तर शहरातील धर्मांधांच्या हिंसक कारवाया आतापर्यंत संपल्या असत्या. – संपादक)
दंगेखोरांना शोधून अटक करणार !
याविषयी पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले की, सध्या शहरात ३ सहस्र ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगेखोरांवर पोलीस कारवाई करत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. दंगली करणार्या तरुणांना पकडण्यासाठी पथके सिद्ध करणार आहे. या दंगलखोरांना शोधून त्यांना अटक करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
किराडपुरा परिसरात रहदारीही चालू !
किराडपुरा भागात हळूहळू रहदारीही चालू होत आहे. किराडपुरा येथील ज्या मंदिरासमोर तणाव झाला, त्या मंदिरातही रामनवमीचा उत्सव उत्साहात पार पडला. स्वत: पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दंगल होत असतांना श्रीराममंदिरात जाऊन व्हिडिओ काढत वेळ घालवण्यापेक्षा बाहेर दंगल करणार्या स्वतःच्या धर्मबांधवांना जलील यांनी का थांबवले नाही ?
हिंदूंनो, दंगलीच्या वातावरणात हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणार्या धर्मांधांच्या ढोंगी नेत्यांची मानसिकता जाणा ! शांतता ठेवण्याचे आवाहन करणारे ढोंगी इम्तियाज जलील !
छत्रपती संभाजीनगर येथे २९ मार्चला दंगल चालू झाल्यावर तेथील एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी लगेच तेथील श्रीराममंदिरात जाऊन शांतता राखण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ काढून प्रसारित केला. (शहरातील शांतता भंग कुणी केली ? त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मंदिरात येऊन हिंदूंना शांततेचे आवाहन करणार्या जलील यांना हिंदूंनी खडसावणे आवश्यक ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|