ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

वेदनेने जोरजोरात किंचाळतात झाडे-वनस्पती; संशोधनात मोठा दावा..


वृक्षारोपण करण्याचं आवाहन अनेकदा करण्यात येतं. बरेचजण आवडीनं वृक्षरोपण करतात. तर, अनेकदा काहीजण घराच्या अंगणात, गच्चीवर विविध वृक्षांचं रोपण करतात.मात्र, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर लावलेल्या एखाद्या झाडाची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर संबंधित झाड दु : खी होऊन विव्हळतं? एका संशोधनानंतर हा दावा करण्यात आलाय. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.तुम्हाला बागकामाची आवड असेल आणि तुम्ही तुमच्या बागेत भरपूर झाडं लावली असतील, तर ही निश्चित चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही त्या झाडांची काळजी घेत नसाल, तर वेळीच सावध व्हा.

कारण पाण्याअभावी किंवा तीव्र सूर्यप्रकाशामुळे कोमेजणारी झाडं अल्ट्रासॉनिक ध्वनी उत्सर्जित करतात. ही एक प्रकारची किंचाळी असते, जी जखमी किंवा त्रासलेल्या व्यक्तीसारखीच असते. ‘सेल’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आलाय. ‘साउंड एमिटेड बाय प्लांट्स अंडर स्ट्रेस’ या अभ्यासात असं समोर आलं आहे की, जवळपास सर्वच वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी उत्सर्जित करीत असतात.

पण या आवाजावरून वनस्पती आनंदी आहे की अस्वस्थ, हे समजू शकतं. खरं तर, आतापर्यंत वनस्पती कोणताही आवाज करत नाहीत, असं मानलं जातं होतं. परंतु या अभ्यासानंतर वनस्पती आवाज करत असल्याचं समोर आलं आहे.
म्हणून वनस्पतींचा आवाज ऐकू येत नाही एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 20 kHz तीव्रतेपर्यंतचा आवाज ऐकू शकते. ही वारंवारता बालपणात या श्रेणीत राहते, परंतु वयानुसार ती कमी होते. 20 kHz वरील फ्रिक्वेन्सी अल्ट्रासॉनिक ध्वनी म्हणून ओळखली जाते. पाण्याअभावी कोमेजणाऱ्या वनस्पती 40 ते 80 kHz आवाज उत्सर्जित करतात.

ही आवाजाची वारंवारता ही एखाद्या माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे वनस्पतींचा आवाज व्यक्तीला ऐकू येत नाही. अनेक अभ्यासांमध्ये, असं समोर आलं आहे की, 60 डेसिबलपर्यंतचा आवाज एखाद्या व्यक्तीसाठी सामान्य आहे. पण यापेक्षा जास्त आवाज कानाच्या पडद्यावर परिणाम करू शकतो.

एखादी व्यक्ती जे काही ऐकते, सायन्समध्ये ते डेसिबलमध्ये मोजलं जातं. पाने पडण्याचा किंवा श्वास घेण्याचा आवाज 10 ते 30 डेसिबल असतो. हा असा आवाज असतो, ज्याचा आपल्याला त्रास होत नाही.तर, अल्ट्रासॉनिक आवाज हा काही वेगळ्या प्रकारचा नसून तो सामान्य आवाज आहे. परंतु तो इतका उच्च वारंवारतेचा आहे, जो माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या बाहेर आहे.

हा आवाज कुत्रं, उंदीर आणि वटवाघुळांच्या ऐकण्याच्या क्षमतेत येतो. म्हणजे कुत्रं, उंदीर किंवा वटवाघुळांना झाडांच्या किंकाळ्या ऐकू येतात. असा करण्यात आला अभ्यास ‘साउंड एमिटेड बाय प्लांट्स अंडर स्ट्रेस’ अभ्यासासाठी ग्रीन हाउसमध्ये टोमॅटो आणि तंबाखूची झाडं लावण्यात आली होती. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळ्या पद्धतीनं काळजी घेण्यात आली.

काही वनस्पतींना योग्य पाणी दिलं, खूप काळजी घेतली. तर, काही झाडांना पाणी दिलं गेलं नाही. तसंच झाडांसाठी वापरण्यात आलेल्या मातीमध्ये फरक ठेवण्यात आला. त्यानंतर झाडांचा आवाज टिपण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सची मदत घेण्यात आली.

या अभ्यासात, असं आढळून आलं की वेगवेगळ्या परिस्थितीत वनस्पती वेगवेगळे आवाज काढतात. आनंदात किलबिलाट करतात, तर दुःखात किंचाळतात. सरासरी वनस्पती तासातून एकदा आवाज काढते, तर तणावग्रस्त झाडे 13 ते 40 वेळा कर्कश किंवा किंकाळ्यासारखे आवाज काढतात. सेल जर्नलमध्ये प्रकाशित पेपरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ज्या झाडांना दररोज पाणी लागते, त्यांना दोन दिवस पाणी दिलं नाही तर ती रडू लागतात.

हे आवाज पाचव्या दिवशी खूप मोठे होतात, जे इतर जवळच्या वनस्पतीदेखील ऐकतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात. त्या वनस्पतींची पानं त्या कमकुवत वाळलेल्या झाडाकडे झुकू लागतात. हे एक प्रकारे सांत्वन देण्यासारखं आहे. दरम्यान, झाडांमध्ये हा आवाज कसा निर्माण झाला, याचं कारण शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही.

मदतीसाठी पुढे येतात इतर प्राणी झाडांची ही किंकाळी ही फक्त आजूबाजूच्या वनस्पतींपर्यंतच पोहोचत नाही, तर वटवाघूळ, उंदीर यासारख्या इतर प्राण्यांपर्यंत पोहोचते. बऱ्याचदा हे प्राणीसुद्धा झाडांच्या मदतीसाठी पुढे येतात. झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. संशोधनात सहभागी असणारे तेल अवीव विद्यापीठातील बायोलॉजिस्ट लिहेच हेडेनी यांचा असा दावा आहे की, वनस्पतींवर वाढणाऱ्या अनेक प्राण्यांच्या प्रजाती त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.दरम्यान, वनस्पती या सजीव आहेत. परंतु अनेकदा त्यांच्या आवाज आपल्याला ऐकू येत नाही. पण त्यांनाही जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळाल्या नाहीत, तर इतर सजीवांप्रमाणे त्रास होतो, हे या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button