ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांना मदतीसाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, कांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार : अजित पवार


मुंबई: अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्यापिकांचं मोठं नुकसान झालं आहे. फळबागांनाही मोठा फटका बसलाय. मात्र, अनेक ठिकाणी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. अजित पवार यांनी नाशिकमध्ये (Nashik) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कांद्यासाठी प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान देतील अशी अपेक्षा होती

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होण्यास वेळ लागली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे पवार म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून कांद्याचा प्रश्न उचलला होता. आम्ही अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदान देतील अशी अपेक्षा होती. पण राज्य सरकारनं शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान दिले आहे. याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त केली अजून, अनुदान वाढवून देण्याची मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले.

कांदा खरेदीाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

कांदा खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. 25 मार्चला अधिवेशन संपले आणि आज 30 तारीख आहे. नाशिकमध्ये नाफेडकडून कांद्याची खरेदी बंद झाली आहे. ती पुन्हा सुरु व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासी संपर्क साधणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कांदा उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून नाशिकचे ओळख आहे. त्यामुळं सरकारनं बंद झालेली कांदा खरेदी केंद्र सुरु करावी असे अजित पवार म्हणाले.सध्या काही ठिकाणी सरकारी हरभरा खरेदी केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, आणखी हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात केळी, संत्रा, द्राक्ष बागांचेही मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदत झाली नाही. तातडीनं शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

…हा राज्य सरकारचा अपमान नाही का?

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नपुंसक म्हटलं आहे. हा राज्य सरकारचा अपमान नाही का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. हा सरकारचा कमीपणा नाही का? असे अजित पवार म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button