भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही लोकशाहीची सर्वोत्तम जाहिरात – PM मोदी
नवी दिल्ली: भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही या जगातील लोकशाहीची सर्वोत्तम जाहिरात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.
लोकशाहीसाठी आयोजित दुसऱ्या शिखर परिषदेच्या नेता-स्तरीय समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी संबोधित करताना त्यांनी लोकशाही, स्वच्छ ऊर्जा, आर्थिक विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, कोस्टा रिकाचे अध्यक्ष रॉड्रिगो चावेस रॉबल्स, झांबियाचे अध्यक्ष हकाईंडे, हिचिलेमा, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनी सह-होस्ट केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाही ही केवळ एक रचना नसून ती एक आत्मा आहे आणि ती प्रत्येक माणसाच्या गरजा आणि आकांक्षा तितक्याच महत्त्वाच्या आहेत या विश्वासावर आधारित आहे. “म्हणूनच, भारतात आमचे मार्गदर्शक तत्वज्ञान सबका साथ, सबका विकास आहे, ज्याचा अर्थ ‘सर्वसमावेशक वाढीसाठी एकत्र प्रयत्न करणे’ आहे. कोविड दरम्यान हे भारतीय लोकांनी हे सिद्धही केले आहे. यावेळी भारताचा प्रतिसाद लोक-चलित होता.
लोकशाही शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, “सबका साथ, सबका विकास, म्हणजे ‘सर्वसमावेशक वाढीसाठी एकत्र प्रयत्न करणे’ हे आमचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान आहे. याचे उदाहरण देताना ते म्हणाले की जीवनशैली बदलांद्वारे हवामान बदलाशी लढा देण्याचा आमचा प्रयत्न असो किंवा वितरित साठवणुकीद्वारे पाणी वाचवणे असो, अथवा प्रत्येकाला स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरवणे असो, प्रत्येक उपक्रम हा भारतातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांनी चालतो,” मोदी म्हणाले.
कोविड-19 दरम्यान, भारताचा प्रतिसाद लोक-चालित होता, असे मोदी म्हणाले. “त्यांनीच मेड-इन-इंडिया लसींचे दोन अब्जाहून अधिक डोस देणे शक्य केले. आमच्या ‘लस मैत्री’ उपक्रमाने लाखो लसी जगासोबत सामायिक केल्या. यासाठी आम्हाला वसुधैव कुटुंबकम् या आमच्या लोकशाहीच्या भावनेनेच मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याचा पुनरुच्चार केला.
PM Modi in Democracy Summit : भारत हीच लोकशाहीची खरी जननी
भारत हीच खरे तर लोकशाहीची जननी आहे. असे म्हणत पंतप्रधानांनी यासाठी प्राचीन भारतातील व्यवस्थेचे अनेक दाखले दिले. ते म्हणाले. लोकांमार्फत निवडून येणारे नेते अर्थात निर्वाचित नेत्यांची कल्पना ही प्राचीन भारतातील एक सामान्य वैशिष्ट्ये होती. बाकी जगामध्ये ही संकल्पना येण्याआधी फार पूर्वीपासूनच ही संकल्पना भारतात होती. आपली प्राचीन महाकाव्य, महाभारतात नागरिकांचे पहिले कर्तव्य म्हणजे स्वतःचा नेता निवडणे, असे वर्णन आहे. पले पवित्र वेद व्यापक-आधारित सल्लागार संस्थांद्वारे राजकीय शक्ती वापरल्याबद्दल बोलतात. प्राचीन भारतातील प्रजासत्ताक राज्यांचे अनेक ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत, जेथे राज्यकर्ते वंशपरंपरागत नव्हते. त्यामुळे भारत ही खरे तर लोकशाहीची जननी आहे, असे ते म्हणाले.