ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
संभाजीनगरमधील घटनेवर लक्ष ठेऊन आहोत

मुंबई:छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं.
दरम्यान, संभाजीनगर परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यानी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.