सासरी येऊन,पत्नीच्या अंगावर चाकुने सपासप ..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अमरावती : सासरी येऊन पतीने पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आष्टी येथे घडली.

याप्रकरणी वलगाव पोलिसांनी जखमी महिलेचा पती राहुल निंभोरकर (३०, पाळा, ता. मोर्शी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. भाग्यश्री राहुल निंभोरकर (२३) असे जखमी विवाहितेचे नाव आहे.

पती नेहमीच वाद करत असल्याने भाग्यश्री ही पाळ्याहून काही दिवसांपुर्वीच माहेरी आष्टी येथे आली होती. दरम्यान राहुल निंभोरकर हा २८ मार्च रोजी सायंकाळी सासरी आष्टी येथे आला. माहेरी आलेल्या पत्नीला सोबत नेण्याची जिद्द त्याने केली. दरम्यान सर्वांनी रात्री ९ च्या सुमारास सर्वांनी जेवण केले. रात्री ११ च्या सुमारास सासू, साळा व साळी असे सर्वजण घरात असताना राहुलने भाग्यश्री हिला सासरी घेऊन जाण्याबाबतचा पुन्हा तकादा लावला.

त्यावर तुम्ही तिला घेऊन जाता, मात्र नेल्यावर तिच्याशी वाद करता, असे सासुने सुनावले. त्यावर राहुुलने भाग्यश्री हिला देखील येण्याबाबत विचारणा केली. त्यावर तिने नकार दिला असता, तो अचानक पत्नीच्या अंगावर धावून गेला. त्याने तिच्या पोटावर, मानेवर, छातीवर, हातावर चाकुने सपासप वार केले. सासु व साळ्याने त्याला अडवायचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीला मरणासन्न स्थितीत तसेच टाकून तो पळून गेला. तिला तातडीने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून अमरावतीला हलविण्यात आले.