Video:लाईव्ह सामन्यात तुफान राडा! रागात फेकली बॅट अन् हेल्मेटच तोडलं

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ऑस्ट्रेलिया : फलंदाजासाठी सर्वात वाईट Bring म्हणजे फलंदाजी करताना बाद होणं. फलंदाज बाद होताच त्यांना राग अनावर होत असतो.

असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियातील तस्मानियामध्ये सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

तर झाले असे, क्लेरीमाँट आणि न्यू नॉरफॉल्क या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना रोमांचक स्थितीत असताना, गोलंदाज हॅरी बूथने फलंदाजी करत असलेल्या क्लेरीमाँट संघातील फलंदाज जेरॉडला धावबाद केलं.( Latest Sports Updates)

फलंदाजी करत असलेला जेरॉड हा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिझच्या बाहेर आला होता. याच गोष्टीचा फायदा घेत, हॅरी बूथने मांकडींग करत जेरॉडची विकेट मिळवली. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केले.

अंपायरने बाद घोषित करताच फलंदाज संतापात दिसून आला. तो बाहेर जात असताना हेल्मेट आणि बॅट फेकताना दिसून आला. फलंदाज बाहेर जात असताना, संघातील काही खेळाडू मैदानात आले आणि अंपायर सोबत वाद घालू लागले.

ही स्थिती पाहता सामना काही काळ थांबवण्यात आला होता. या सामन्यात क्लेरीमाँट संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात नॉरफॉल्क संघाने प्रथम फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना क्लेरीमाँट संघाला अवघ्या २१४ धावा करता आल्या.

या सामन्यात धावबाद होणारा जेरॉड चांगली फलंदाजी करत होता. तो ४३ धावांवर फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राइकला बाद झाला.