मिरज तालुक्यातील समडोळीची झेडपी शाळा राजवाड्यासारखी नटली

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सांगली:सांगलीच्या मिरज तालुक्यामधील समडोळी येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा राजवाड्याप्रमाणे सजली आहे मुलींना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी मिरज तालुक्यातील समडोळी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रुप देण्यात आले आहे.

मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेला शैक्षणिक राजवाड्याचे रुप प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

शाळेची वास्तू पूर्वी वाड्यात होती.

तेथेच अत्याधुनिक साधने वापरुन गतकाळातील राजवाडा पुन्हा साकारण्यासाठी काम सुरु आहे.

मुंबईचे प्रख्यात चित्रकार चंद्रकांत सुतार यांच्या कुंचल्यातून आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून शाळेत सध्या रंगकाम झाले असून चित्रे रेखाटली जात आहेत.

शाळेच्या प्रत्येक भिंतीवर चित्रातून सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक संदर्भ मांडला जात आहे.

शाळेतील प्रत्येक वर्गात बैठकीसाठी उत्तम मॅट, ई लर्निंगसाठी स्मार्ट डिजिटल बोर्ड, प्रोजेक्टरची सोयही उपलब्ध केली आहे.

शाळेच्या भिंतीवरील जिवंत आणि त्रिमितीय चित्रे शिक्षणात नवा रंग भरत आहेत.

मुळात राजवाडा असल्याने ऐतिहासिक रुप देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्याध्यापक कृष्णात पाटोळे म्हणतात..

गाव पातळीवर सर्वांनी सहकार्य केलं असल्याचेही त्यांनी सांगितले.