क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडेखोरांची शेतकऱ्याला केबलच्या वायरने मारहाण, मृत्यू झाल्यानंतर सुध्दा.


अहमदनगर : (आशोक कुंभार )अहमदनगर श्रीगोंदे तालुक्यातील बेळवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरणगाव दुमाला येथे सोमवारी मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरोडेखोरांना प्रतिकार करताना मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांसह काही कागदपत्रे दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. कल्याण गायकवाड (Kalyan Gaikwad) असे या हल्ल्यात मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास हे सगळ प्रकरण घडल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.दरवाज्याला जोराचे धक्के मारुन दरोडेखोरांनी दरवाजा तोडला. त्यानंतर दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. याप्रकरणी बेळवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. गायकवाड यांच्या घरात घुसून दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच पाच हजार रुपये घेऊन चोरट्याने पोबारा केल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेत चार चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या कल्याण गायकवाड या शेतकऱ्याला केबलने चोरट्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु होण्यापुर्वीचं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती कळताच अहमदनगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी केली होती. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आरणगाव परिसर चांगलीच खळबळ उडाली आहे.

रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी गस्त सुध्दा वाढवली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button