आयपीएस अधिकारी आणि मंत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पंजाब: (आशोक कुंभार )मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री असलेले आनंदपूर साहिब मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार हरजोत सिंग बैस या महिन्याच्या अखेरीस आयपीएस अधिकारी ज्योती यादव यांच्याशी लग्न करणार आहेत.
पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग यांनी ट्विटरवर या जोडप्याचे आगामी काळात त्यांच्या ‘नवीन प्रवासासाठी’ अभिनंदन केले.

32 वर्षीय बैस हे आनंदपूर साहिबमधील गंभीरपूर गावचे आहेत आणि ते या जागेवरून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत आणि यापूर्वी त्यांनी पंजाबमधील आपच्या युवा शाखेचे नेतृत्व केले होते. चंदिगडमधील पंजाब युनिव्हर्सिटी त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांनी 2014 मध्ये पदवी प्राप्त केली.

पंजाब कॅडरच्या IPS अधिकारी ज्योती यादव या मानसा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्या मूळच्या गुरुग्रामच्या आहेत.