ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅन्सर असल्याचं सांगत डॉक्टरांनी कापलं गुप्तांग; नंतर समोर आलं असं सत्य


दिल्ली : ‘गुप्तांगात ट्यूमर आहे, शस्त्रक्रिया करावी लागेल.’ डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला आपल्याला इतका महागात पडेल असं रुग्णाला कधीच वाटलं नसेल.
ट्यूमर असल्याच्या संशयावरून डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र नंतर समजलं, की हा ट्यूमर नव्हताच, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या रुग्णाला आपलं गुप्तांग गमवावं लागलं. इटलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला बऱ्याच दिवसांपासून गुप्तांगात वेदना होत होत्या. तो डॉक्टरांकडे गेला.

अनेक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी गुप्तांगात ट्यूमर असल्याचं सांगितलं. हेच या वेदनांचं कारण असल्याचं डॉक्टर म्हणाले. शस्त्रक्रियेच्या मदतीने ट्यूमर काढला जाईल, असं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सांगण्यावरून रुग्णाने ऑपरेशनसाठी होकार दिला.

शस्त्रक्रिया झाली पण ऑपरेशननंतर डॉक्टरांना कळलं की त्याला ट्यूमर नव्हताच. मात्र तोपर्यंत रुग्णाचं गुप्तांग शस्त्रक्रिया करून काढण्यात आलं होतं. ‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, 60 वर्षीय रुग्णाला प्रत्यक्षात सिफिलीस झाला होता. जो औषधाने बरा होऊ शकतो.

मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्याला गुप्तांग गमवावं लागलं. इटलीच्या आरोग्य विभागाने या डॉक्टरविरोधात चौकशी सुरू केली आहे. डॉक्टरला शिक्षा व्हावी आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी रुग्णाने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची इटालियन न्यायालयात 9 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

गेल्या वर्षी अशीच दुसरी घटना युरोपात घडली होती. फ्रान्समधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे गुप्तांग काढण्यात आले. नंतर रुग्णाने दावा केला की डॉक्टरांनी आपलं ऐकलं नाही आणि स्वतःच शस्त्रक्रिया केली. रुग्णाच्या वकिलाने नुकसानभरपाई म्हणून 1 दशलक्ष युरोची मागणी केली. न्यायालयाने त्याला 62,000 युरो भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button