चंद्रपूर येथे रेल्वे इंजिनवर बिबट्या मृताअवस्थेत आढळला

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

चंद्रपूर : (आशोक कुंभार ) जिल्ह्यातील घुग्घुस शहरातील कोळसा रेल्वे परिसरात रेल्वे इंजिनवर बिबट्या मृताअवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे घुग्घुस येथील रेल्वे कोल सायडिंग वर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिन वर बिबट्या मृताअवस्थेत होता, बिबट्याचा मृत्यू विजेच्या हाय टेन्शन ताराशी संपर्क आल्याने किव्हा विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे कोल सायडींग च्या बाजूला घनदाट वस्ती आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांसह पोलिसही घटनास्थळी पोहचले. घटना परिसरात पसरताच बिबट्याला बघायला नागरिकांनी अलोट गर्दी केली.